Favarni Pump Yojana 2025 :तुम्हाला मागील वेळी म्हणजे 2024 मध्ये Battery Operated Favarni Pump Yojana मध्ये लाभ मिळाला नाही? किंवा तुम्ही अर्जच करू शकला नाही? काळजी करू नका – कारण आता आली आहे Solar Favarni Pump Yojana Maharashtra 2025!
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप वाटप योजना सुरू झाली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना 40% ते 50% पर्यंतचे अनुदान दिले जात आहे. चला तर मग, या योजनेची पूर्ण माहिती, पात्रता, कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रिया आपण बघू या.
Solar Favarni Pump Yojana 2025 चे वैशिष्ट्ये
योजनेचे नाव | सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप योजना |
योजना सुरु करणारे | महाराष्ट्र शासन, कृषी विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
लाभ | 40% ते 50% पर्यंत अनुदान |
अर्जाची पद्धत | Online (mahadbt पोर्टलवर) |
अधिकृत वेबसाइट | |
हेल्पलाइन नंबर |
Battery Operated पंप नंतर आता Solar Favarni Pump वाटप सुरू!
2024 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना Battery Operated Favarni Pump वाटप करण्यात आले होते – 100% अनुदानावर. परंतु आता 2025 मध्ये सौरचलीत फवारणी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे – लॉटरी न करता प्रत्यक्ष अर्जाच्या आधारे!
Solar Favarni Pump साठी अनुदान किती मिळेल?
महिला, लहान, सीमान्त, SC/ST – 50% किंवा ₹1800 पर्यंत
इतर शेतकरी – 40% किंवा ₹1500 पर्यंत
पात्रता (Eligibility Criteria)
- शेतकऱ्याकडे Farmer ID (शेतकरी कार्ड) असणे आवश्यक
- स्वतःच्या नावावर शेत जमीन असावी
- यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- यापूर्वी फवारणी पंप योजनेतून अनुदान घेतले नसावे
Solar Favarni Pump साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 आणि 8-अ उतारे
- जमीन दाखला (लागू असल्यास)
- मोबाईल नंबर
- पॅन कार्ड (असेल तर)
Mahadbt वर शेतकरी नोंदणी कशी करावी?
AgriStack पोर्टलवरून Farmer ID काढा – इथे क्लिक कराजर आधीपासून Farmer ID असेल, तर तो वापरून mahadbt वर लॉगिन करा – mahadbt.maharashtra.gov.inलॉगिन केल्यानंतर प्रोफाईल पूर्ण भरा – वैयक्तिक माहिती, पत्ता, जमिनीची माहिती
- AgriStack पोर्टलवरून Farmer ID काढा – इथे क्लिक करा
- जर आधीपासून Farmer ID असेल, तर तो वापरून mahadbt वर लॉगिन करा – mahadbt.maharashtra.gov.in
- लॉगिन केल्यानंतर प्रोफाईल पूर्ण भरा – वैयक्तिक माहिती, पत्ता, जमिनीची माहिती
Solar Favarni Pump Yojana साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
Step 1: mahadbt.maharashtra.gov.in/Farmer वर लॉगिन करा
Step 2: “कृषी यांत्रिकीकरण” योजनेखालील खालील बाबी निवडा:
- मुख्य घटक – कृषी यंत्र औजारांसाठी आर्थिक सहाय्य
- तपशील – मनुष्यचलित औजारे
- साहित्य प्रकार – पिक संरक्षण औजारे
- मशीन प्रकार – सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप
Step 3: सर्व माहिती भरा, चेक बॉक्स निवडा आणि “जतन करा” वर क्लिक करा
Step 4: “अर्ज सादर करा” वर क्लिक करा
Step 5: प्राधान्य क्रम निवडा आणि अर्ज सबमिट करा
Step 6: ₹23.60 अर्ज फी भरावी लागेल
Step 7: अर्जाची प्रत डाउनलोड करा