Good News For Farmer

Good News For Farmer || शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

Good News For Farmer: महाराष्ट्र सरकारने गरीब आणि लहान जमीनधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. “शेळी-बोकड वाटप योजना” अंतर्गत निवडक शेतकऱ्यांना फुकट शेळ्या आणि बोकड दिले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरं उत्पन्न मिळवून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

या योजनेचे फायदे – शेळीपालनातून शाश्वत उत्पन्नाची संधी

  • शेतकरी शेतीशिवाय दुसरा व्यवसाय सुरू करू शकतो
  • शेळ्यांचं दूध, मांस आणि शेण विक्रीस उपयुक्त
  • कमी जागेत शेळ्या सहज सांभाळता येतात
  • मोफत प्रशिक्षण, लसीकरण आणि मार्गदर्शनाची सोय
  • गावातच रोजगार निर्माण होतो, बेरोजगारी कमी होते

शेळीपालन हा कमी गुंतवणुकीतून सुरू करता येणारा फायदेशीर व्यवसाय आहे. विशेषतः पाऊस, बाजारभाव किंवा इतर संकटांमुळे शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी यामधून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती?

सरकारकडून अर्जदारांना मेसेजद्वारे सूचना दिली जात आहे की, सर्व आवश्यक कागदपत्रं 

https://ah.mahabms.com या वेबसाइटवर अपलोड करा. वेळेत कागदपत्रं न दिल्यास योजना रद्द होऊ शकते.

अर्ज करण्यासाठी येथे करा

आवश्यक कागदपत्रांची यादी:

  • आधार कार्ड
  • 7/12 आणि 8अ उतारा
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • अपत्य प्रमाणपत्र / कौटुंबिक घोषणा पत्र
  • जात प्रमाणपत्र (जर लागू होत असेल तर)
  • BPL प्रमाणपत्र (गरिबी रेषेखालील कुटुंबांसाठी)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रं
  • रोजगार नोंदणी प्रमाणपत्र
  • गट सदस्यत्व प्रमाणपत्र (जर गटात सामील असाल तर)

कोणाला प्राधान्य दिलं जातं?

ही शेळी बोकड वाटप योजना 2025 खालील लाभार्थ्यांना प्राधान्य देते:

  • अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी
  • महिलांचा सहभाग असलेले कुटुंब
  • दिव्यांग व्यक्ती
  • अल्पभूधारक गरीब शेतकरी

तसेच, सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडते. तालुका अधिकारी, ग्रामसेवक यांचे सहकार्य घेतले जाते, त्यामुळे भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार टाळता येतात.

शेळी बोकड मोफत वाटप योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. या योजनेच्या मदतीने शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो.

ज्यांनी योजना मंजूर केली आहे, त्यांनी लगेच आपली कागदपत्रं वेळेत अपलोड करावीत आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्यासाठी येथे करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply